अदानी ग्रुप चे 2 शेअर पडले , ₹4000 वरून ₹700 पर्यंत ; आता या इंडेक्समधून होणार बाहेर!

Adani Group is an Indian multinational conglomerate, headquartered in Ahmedabad. Founded by Gautam Adani in 1988 as a commodity trading business, the Group's businesses include port management,

अदानी ग्रुप चे 2 शेअर पडले , ₹4000 वरून ₹700 पर्यंत ; आता या इंडेक्समधून होणार बाहेर!

(Adani group) कंपनी असलेल्या अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) आणि अदानी टोटल गॅससाठी (Adani total gas) पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण 31 मे रोजी या दोन्ही कंपन्यांना MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समधून वगळण्यात येणार. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते, या बदलामुळे एकूण 350 मिलियन डॉलर अथवा त्याहून अधिक काढले जाण्याची शक्यता आहे.

नुवामाच्या मते, अदानी ट्रान्समिशन मधून 189 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. तसेच, अजानी टोटल गॅसमधून 167 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही शेअर्समधून एकूण 356 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे.

अदानी ट्रान्समिशन 2% ने घसरला - 

यातच, अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी ट्रान्समिशनचा शेअर सोमवारी 2 टक्क्यांनी घसरून 825 रुपयांवर आला. सप्टेंबर 2022 मध्ये या शेअरने 4,238.55 रुपयांचा 52 आठवड्यांतील उच्चांक गाठला होता. तसेच, 1 मार्च 2023 रोजी, हा शेअर 630 रुपये या 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला होता. अर्थात या काळात हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अदानी समूहाचे सर्व शेअर्स दबावाखाली होते.

अदानी टोटल 3% घसरला - 


सोमवारच्या ट्रेडिंग दरम्यान अदानी टोटल गॅसचे शेअर जवळपास 3 टक्क्यांनी घसरून 738.55 रुपयांवर आले. या शेअरने 23 जानेवारी 2023 रोजी 3,998.35 रुपये हा 52 आठवड्यांतील उच्चांक गाठला होता. तसेच, 19 मे 2023 रोजी हा शेअर घसरून 633.35 रुपयांच्या 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर गेला होता. केवळ 5 महिन्यांतच एवढ्या मोठ्या घसरणीचे कारण हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि कंपनीशी संबंधित काही निगेटिव्ह बातम्या हे होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow