डोळ्यांची काळजी घेण्यासाठी ‘या’ खास टिप्स फॉलो करा

 0
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी ‘या’ खास टिप्स फॉलो करा

सुंदर जग पाहण्यासाठी डोळ्यांचे सुरक्षित असणे फार महत्त्वाचे आहे. डोळे शरीराचा महत्त्वपूर्ण आणि नाजूक अवयव आहेत म्हणून त्यांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. 

चला तर मग आज आपण जाणून घेऊया डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती.

● डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्या.‎

● डायबेटिस, उच्च रक्तदाबाच्या या तक्रारीमुळे दृष्टिदोष निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे हे त्रास असणाऱ्यानी डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यावी.

● ‎डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत कोणतेही आयड्रॉप्स घालू नका.

● ‎उन्हात काम करताना दर्जेदार गॉगल्स घाला.

● ‎आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा. ‘अ’ जीवनसत्त्व असणारी फळे उदा. गाजर, बीट, टोमॅटो इ. खावीत.

● ‎टीव्ही, स्मार्टफोनचा मर्यादित वापर करा. जास्त वेळ लॅपटॉप किंवा संगणकासमोर काम केल्यावर थोडावेळ डोळे मिटून शांत बसा.

● ‎कॉम्प्युटर आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर योग्य प्रमाणात म्हणजेच 3 फुटांचे आहे की नाही याची खात्री करुन घ्या.

● ‎प्रवास करताना वाचने टाळा. ‎पुरेशी झोप व विश्रांती घ्या.

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Downloadअँप 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Vilas Rathod Founder | Writer | Blogger