उपचार रक्तदाब क्षयावर...

High Blood Pressure : गुरुकुल पारंपरिक उपचार : मानेच्या मणक्यातील दोष, चक्कर आणि रक्तदाबक्षय असे स्वरूप असेल तर चंद्रकला रस, लाक्षादी गुग्गुळ आणि गोक्षुरादी गुग्गुळ गोळ्या प्रत्येकी तीन, सकाळ-संध्याकाळ बारीक करून रिकाम्या पोटी गरम पाण्यातून घेणे. पांडुता आणि रक्तदाबक्षय असे स्वरूप असल्यास चंद्रकलासर, सुवर्णमाक्षिकादिवटी प्रत्येकी तीन गोळ्या, सकाळ-सायंकाळ घेणे. रक्तदाबक्षय आणि ओजक्षय, शब्दासहिष्णुता हे लक्षण … The post उपचार रक्तदाब क्षयावर... appeared first on पुढारी.

उपचार रक्तदाब क्षयावर...

वैद्य विनायक खडीवाले

High Blood Pressure : गुरुकुल पारंपरिक उपचार : मानेच्या मणक्यातील दोष, चक्कर आणि रक्तदाबक्षय असे स्वरूप असेल तर चंद्रकला रस, लाक्षादी गुग्गुळ आणि गोक्षुरादी गुग्गुळ गोळ्या प्रत्येकी तीन, सकाळ-संध्याकाळ बारीक करून रिकाम्या पोटी गरम पाण्यातून घेणे. पांडुता आणि रक्तदाबक्षय असे स्वरूप असल्यास चंद्रकलासर, सुवर्णमाक्षिकादिवटी प्रत्येकी तीन गोळ्या, सकाळ-सायंकाळ घेणे. रक्तदाबक्षय आणि ओजक्षय, शब्दासहिष्णुता हे लक्षण असल्यास लघुसुतशेखर गोळ्या तीन, सकाळ-संध्याकाळ घ्याव्या. रात्री झोपताना निद्राकरवटी 6 गोळ्या घ्याव्या. वजन कमी, दुर्बलता हे लक्षण असल्यास अश्वगंधापक, कुष्मांडपाक, च्यवनप्रकाश किंवा शतावरीकल्प यांपैकी एक सकाळ- सायंकाळ दुधातून दोन चमचे द्यावे. डोकेदुखी नसेल तर रसायन काळी रसायनचूर्ण गरम पाण्यातून देणे. अतिकृशता असेल तर शतावरीघृत सकाळ-सायंकाळ दोन दोन चमचे द्यावे.

High Blood Pressure : ग्रंथोक्त उपचार : या विकाराच्या रुणांना केवळ तुपावर, शतावरीघृत किंवा योग्य त्या तेल, चरबी, मज्जा अशा स्नेहावर ठेवणे. गुळवेल सत्त्व तूप व साखरेसह खावे. लघुसुतशेखर.

विशेष दक्षता आणि विहार : थोडे थोडे जास्त वेळ सकस आणि चौरस आहार घ्यावा. साखर, मीठ, यांचा वापर जास्त प्रमाणात असला तरी

चालेल. आनंदी चिंतामुक्त जीवन आणि भरपूर झोप घ्यावी. फाजील वजन वाढू देऊ नये.

High Blood Pressure : पथ्य

शक्तिवर्धक, बलवर्धक, आहार, पेढे, बर्फी, गोड सरबत, निरा, कॉफी, मणुका, खजूर, बीट, गाजराचा हलवा, इत्यादी गाजर हे धातुवर्धन आणि रक्तवर्धनास उपयुक्त आहे.

कुपथ्य : अवेळी भोजन, अतिश्रम हे टाळावे. तिखट, आंबट, खारट, कदान्न वर्ज्य करावे. किरकोळ तक्रारींकरिता स्ट्राँग औषधे टाळावीत. चिंता, काळजी, धास्ती, कमी झोप नको.

रसायनचिकित्सा : कोहळा पाक, कोहळा रस, कोहळ्याच्या वड्या, उपयुक्त आहेत. तसेच गाजर+साखर+दूध घ्यावे.

योग आणि व्यायाम : सूर्यनमस्कार.

रुग्णालयीन उपचार : रुग्ण अशक्त असेल तर अच्छ स्नेहपान, केवळ तुपावर राहावे.

अन्न षष्ठी उपक्रम (पंचकर्मादी) : बृहण बस्ती.

चिकित्साकाल : कमी लक्षणे आणि नवीनच असेल तर सुसाध्य; जास्त लक्षणे आणि तरुण रुग्ण असल्यास कष्टसाध्य.

High Blood Pressure : निसर्गोपचार

मन:शांती, भरपूर झोप, आनंदी राहणी आणि पौष्टिक, सकस आहार.

अपुनर्भवचिकित्सा : तसा हा व्याधी औषधाशिवाय बरा होऊ शकतो. यावरील चिकित्सा अवघड आहे. गुळवेल, आवळा, हिरडा, बेहडा यांचा काढा करून मध, साखरेसह 21 दिवस घ्यावा. शतावरीकल्प कायम ठेवावा.

संकिर्ण : कोहळा बल्य म्हणून सांगितला आहे. हा एक वर्षावा जुना, जाड, पांढरी साल आणि भरपूर बिया असलेलाच वापरावा.  अतिविचार, जागरण यामुळे मेंदूकडे रक्ताचे वहन जास्त झाल्याचे शरीरात अन्य ठिकाणी रक्तदाबक्षय होतो म्हणून डोक्याखाली उशा घेऊन विश्रांती घ्यावी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow