छातीत जळजळ होतेय? जाणून घ्या यावर घरगुती उपाय
आपल्यापैकी अनेकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते. प्रामुख्याने पित्त वाढवणाऱ्या आहारामुळे हा त्रास होत असतो.
त्यामुळे आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केल्यास व योग्य आहार, पुरेशी झोप घेतल्यास छातीत जळजळण्याची समस्या निश्चितच दूर होईल.
चला तर या समस्येवरील उपाय आपण जाणून घेऊ
आले - छातीत जळजळत असल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे छातीतील जळजळ कमी होऊन आराम पडतो.
थंड दूध - छातीत जळजळणे यावर थंड दूध पिणे उपयुक्त ठरते. तसेच दुधात मनुका घालून उकळून ते दूध थंड झाल्यावर प्यावे व मनुकाही खाव्यात. छातीतील जळजळ दूर होते.
केळे - छातीमध्ये जळजळ होत असल्यास केळे खाल्याने आराम मिळतो.
What's Your Reaction?