Jayant Patil on Ajit Pawar : माझ्यासमोरच अजित पवारांनी प्रकाश सोळंकेना 'तो' शब्द दिला; आता जयंत पाटलांनी सांगितला घटनाक्रम!

Jayant Patil on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या धक्कादाय खुलाशानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात कलगीतुरा रंगला आहे. अजित पवार यांनी आमदार प्रकाश सोळंकेंवरून केलेल्या दाव्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही खुलासा करत अजित पवार यांना टोला लगावला आहे.  प्रकाश सोळंकेवर जयंत पाटील काय म्हणाले?  जयंत पाटील यांनी सांगितले की, त्यांना (प्रकाश सोळंके) मंत्रीच व्हायचं होत. मला मंत्री का केलं नाही म्हणून ते चिडून आले. ते राजीनामा देत होते, पणं मी त्यांना बोलावलं. त्यावेळी अजित पवारांनी माझ्यासमोरच सोळंखीना सांगितले की तुम्हाला पक्षाचे कार्याध्यक्ष पद देतो, पण नंतर मला कधी पक्षाने तसे सांगितल नाही. मला सांगितलं असतं तर मी राजीनामा दिलाच असता. जिव्हाळा असता तर त्यांनी प्रकाश याना मंत्री केलं असतं ते पुढे म्हणाले की, सोळंके यांची नाराजी दूर करण्याची संधी अजित पवार यांना आली होती. आता नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यावेळी बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंके यांच्याबद्दल जिव्हाळा असता तर त्यांनी प्रकाश याना मंत्री केलं असत, असा टोलाही लगावला. प्रकाश सोळंके आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं गणित बसवूच, पण मला माहित नाही ते येतील की नाही.  शरद पवार राजीनामा/आंदोलनावर काय म्हणाले? शरद पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, त्याविषयी मला काही माहिती नाही. आंदोलन, राजीनामा असं काही ठरलेलं नव्हतं. आंदोलन करा असं कोणी कोणाला आदेश दिले नव्हते. शरद पवारांनी गाफील ठेवलं याबाबत त्यांनी बोलण्यास नकार देताना मी आता बोलायची आवश्यकता नाही, निवांत बोलेन कधी तरी, असे सांगितले.  बारामती जागवेर म्हणतात...  त्यांचा पक्ष वेगळा झाला आहे, त्यांना काही जागा लढवाव्या लागतील. काही मतदारसंघात ते लढतील, पण ते खरंच लढवणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायचं, असा टोलाही त्यांनी लगावला.  एकनाथ शिंदे यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागू दे  संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या दाव्यावर बोलताना जयंत पाटील यांनी सांगतिले की, मला माहित नाही. एकनाथ शिंदे यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागू दे. तुम्ही नका त्यांना त्रास देऊ. ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही. परिस्थिती अशी की हे कधी जाणार म्हणून IAS अधिकारी IPS ऐकायच्या मनस्थितीत नाही. सगळं सरकारच ठप्प होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवणं योग्य नाही.  इतर महत्वाच्या बातम्या  Sanjay Raut : संजय राऊतने कधी माफी मागितली नाही; सत्य सत्य आहे तर माफी का? दादा भुसेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी; राऊतांचा टोला

Jayant Patil on Ajit Pawar : माझ्यासमोरच अजित पवारांनी प्रकाश सोळंकेना 'तो' शब्द दिला; आता जयंत पाटलांनी सांगितला घटनाक्रम!

Jayant Patil on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या धक्कादाय खुलाशानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात कलगीतुरा रंगला आहे. अजित पवार यांनी आमदार प्रकाश सोळंकेंवरून केलेल्या दाव्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही खुलासा करत अजित पवार यांना टोला लगावला आहे. 

प्रकाश सोळंकेवर जयंत पाटील काय म्हणाले? 

जयंत पाटील यांनी सांगितले की, त्यांना (प्रकाश सोळंके) मंत्रीच व्हायचं होत. मला मंत्री का केलं नाही म्हणून ते चिडून आले. ते राजीनामा देत होते, पणं मी त्यांना बोलावलं. त्यावेळी अजित पवारांनी माझ्यासमोरच सोळंखीना सांगितले की तुम्हाला पक्षाचे कार्याध्यक्ष पद देतो, पण नंतर मला कधी पक्षाने तसे सांगितल नाही. मला सांगितलं असतं तर मी राजीनामा दिलाच असता.

जिव्हाळा असता तर त्यांनी प्रकाश याना मंत्री केलं असतं

ते पुढे म्हणाले की, सोळंके यांची नाराजी दूर करण्याची संधी अजित पवार यांना आली होती. आता नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यावेळी बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंके यांच्याबद्दल जिव्हाळा असता तर त्यांनी प्रकाश याना मंत्री केलं असत, असा टोलाही लगावला. प्रकाश सोळंके आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं गणित बसवूच, पण मला माहित नाही ते येतील की नाही. 

शरद पवार राजीनामा/आंदोलनावर काय म्हणाले?

शरद पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, त्याविषयी मला काही माहिती नाही. आंदोलन, राजीनामा असं काही ठरलेलं नव्हतं. आंदोलन करा असं कोणी कोणाला आदेश दिले नव्हते. शरद पवारांनी गाफील ठेवलं याबाबत त्यांनी बोलण्यास नकार देताना मी आता बोलायची आवश्यकता नाही, निवांत बोलेन कधी तरी, असे सांगितले. 

बारामती जागवेर म्हणतात... 

त्यांचा पक्ष वेगळा झाला आहे, त्यांना काही जागा लढवाव्या लागतील. काही मतदारसंघात ते लढतील, पण ते खरंच लढवणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायचं, असा टोलाही त्यांनी लगावला. 

एकनाथ शिंदे यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागू दे 

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या दाव्यावर बोलताना जयंत पाटील यांनी सांगतिले की, मला माहित नाही. एकनाथ शिंदे यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागू दे. तुम्ही नका त्यांना त्रास देऊ. ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही. परिस्थिती अशी की हे कधी जाणार म्हणून IAS अधिकारी IPS ऐकायच्या मनस्थितीत नाही. सगळं सरकारच ठप्प होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवणं योग्य नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow