मराठवाड्यातील बाळांसाठी आईच्या दुधाची पहिली बँक छत्रपती संभाजीनगरमध्ये

छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाड्यातील पहिली मानवी दूध बँक स्थापन करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील बाळांसाठी आईच्या दुधाची पहिली बँक छत्रपती संभाजीनगरमध्ये

आईचे दूध (Mother Milk)हे नवजात शिशूसाठी महत्त्वाचे असते, मात्र दुर्दैवाने अनेक शिशूंना आईचे दूध मिळत नाही. आता अशा शिशूंना मानवी दूध बँकेद्वारे आईचे दूध मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाड्यातील पहिली मानवी दूध बँक (Milk Bank) तयार झाली असून, महिनाभरात ती कार्यान्वित होणार आहे. विशेष म्हणजे ही बँक नवजात शिशूंसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. 

प्रसूतीनंतर अनेक मातांना पुरेसं दूध येत नाही, काहींना उपचारामुळे शिशूंना दूध पाजता येत नाही. अशावेळी शिशुंना गाईचे अथवा पावडरचे दूध पाजण्याची वेळ ओढवते. परंतु शिशुंना आईचेच दूध मिळावे या दृष्टीने ह्युमन मिल्क बँक साकारण्यात आली आहे. यात आईचे दूध संकलित करून त्यावर आवश्यक ती प्रक्रिया करून ते गरजू-बाळांना दिले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ही मानवी दुधाची बँक सुरू करण्यात येणार आहे. महिनाभरात ही बँक कार्यान्वित होणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात दरवर्षी 3000 ते 3500 अत्यवस्थ नवजातांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जातात. शासकीय घाटीमध्ये दररोज 60 ते 70 प्रसूती होतात. याच घाटी रुग्णालयात दररोज 10 ते 12 नवजात शिशु या विभागात दाखल होतात. तर प्रसूतीनंतर आईचे दूध बाळासाठी अमृत समजले जाते. आईच्या दुधात बाळासाठी पौष्टिक घटक महत्त्वाचे असतात. मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस, आयोडीन, आयर्न, पोटॅशियम फोलेट्स, जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, उत्तम फॅट या घटकांचा दुधामध्ये समावेश असतो. मात्र दुर्दैवाने अनेक शिशूंना आईचे दूध मिळत नाही. त्यामुळे अशा बाळांसाठी आता मानवी दूध बँकेद्वारे आईचे दूध मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील ही पहिली बँक असणार आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow