छ. संभाजीनगरमध्ये एकाचवेळी 1,198 ग्रामपंचायत सदस्य अपात्र

Stay updated with the latest news and events in Ch. Sambhajinagar. Get breaking news, local stories, and important updates from Sambhajinagar News

छ. संभाजीनगरमध्ये एकाचवेळी 1,198 ग्रामपंचायत सदस्य अपात्र

विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1 हजार 198 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सरपंच, उपसरपंचांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा पाहायला मिळत आहे. एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 617 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया 18 जानेवारी 2021 रोजी पूर्ण झाली होती. 

या निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत सादर करणे आवश्यक होते. पण विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्ह्यातील 1 हजार 198 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे.

कोणत्या तालुक्यात किती जणांना अपात्र ठरवले 
औरंगाबाद : 118
पैठण : 469
फुलंब्री : 54
सिल्लोड : 197
सोयगाव: 36
कन्नड: 50
खुलताबाद : 20
वैजापूर : 150
गंगापूर : 104

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow