चौदावं लागलं तरी मुलीचे वाचा सविस्तर

Discover the inspiring journey of a talented fourteen-year-old girl as she navigates her passions and aspirations. Explore her creative projects, accomplishments, and experiences in various fields. Join us to witness the incredible potential and growth of this remarkable young individual

चौदावं लागलं तरी मुलीचे वाचा सविस्तर

मुलगी मोठी झाल्यावर तिची मासिक पाळी येण्याचीही तयारी असते. ऐनवेळी मुलीचा गोंधळ होऊ नये म्हणून मुलीच्या पहिल्या मासिक पाळीसाठी आईने तिला तयार केले पाहिजे. जर तुमची मुलगी देखील तारुण्याच्या वयात आली असेल आणि अद्याप तिची पाळी सुरू झाली नसेल तर अनेक मातांना टेंशन येतं किंवा आपल्या बरोबरच्या मुलींना पाळी आली आपल्याला अजून आलेली नाही असं वाटून मुली विचारात असतात. अशावेळी नेमकं काय करायचं, कोणाशी बोलायचं? आपली समस्या कोणाला सांगायची हे कळत नाही.  याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

पाळी वेळेवर का येत नाही?

मुलीच्या पहिल्या पाळीच्या वयावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. आईच्या  मेनार्चेच्या वयाचा मुलीच्या पाळी येण्याच्या वयाशी संबंध असतो. ओव्हर वेट मुलींना पाळी येण्यास उशीर होऊ शकतो तर अंडर वेट असलेल्या मुलींची पाळी लवकर सुरू होऊ शकते. ज्या मुली व्यवस्थित व्यायाम करतात, फिजिकली एक्टिव्ह असतात. जंक फूड कमी प्रमाणात खातात त्यांची पाळी वेळेवर येऊ शकते. या ऊलट व्यायाम करत नसलेल्यांमध्ये पाळी वेळेवर येत नाही. प्रोटीन्स, फायब्रस आणि पोषक आहार  घेतल्यासही पाळी वेळेवर सुरू होते. 

पालकांनी काय करायला हवं?

जर  तुमच्या मुलीची पाळी वेळेवर सुरू झाली नसेल तर तुम्ही गायनेकोलोजिस्टशी बोलायला हवं. कारण मासिक पाळीनंतर मुलीला आपल्या शरीरात होत असलेल्या मोठ्या बदलांसाठी तयार राहावं लागत असतं.  भारतातील सुमारे 71% मुलींना त्यांच्या पहिल्या पाळीच्यावेळेबद्दल माहिती नसते. यामुळे, जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा मुलींना मानसिक ताणतणावातून जावे लागते. म्हणूनच, पीरियड्स सुरू होण्याच्या वयात आईने आपल्या मुलीला याबद्दल  माहिती दिली पाहिजे.

मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. यावेळी वैयक्तीक स्वच्छतेची काळजी न घेतल्यास संसर्ग होऊ शकतो. म्हणून मुलीला आधीच सर्व गोष्टींबाबत कल्पना द्यायला हवी. तुमच्या मुलीनं न घाबरता या नवीन बदलांचा सामना करावा असं वाटत असेल तर नेहमीच योग्य मार्गदर्शन देणं हे तुमचं पहिलं काम आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow