पुण्यातील दुर्दैवी घटना : भीमा नदीत बुडून तिघांचा मृत्यू
दौंंड तालुक्यात हातवळण येथील भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी तीन मुले नदीत बुडाल्याची घटना शनिवारी (दि. ७) दुपारच्या सुमारास घडली.
दौंंड तालुक्यात हातवळण येथील भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी तीन मुले नदीत बुडाल्याची घटना शनिवारी (दि. ७) दुपारच्या सुमारास घडली. यावेळी स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी शोध सुरु केला. यावेळी एका मुलाचा मृतदेह मिळाला होता; मात्र दोघांचा तपास लागला नव्हता. त्यानंतर इतर दोघांच्या शोधासाठी आज सकाळपासूनच पाटस पोलीस व ग्रामस्थ यांनी शोधमोहीम सुरु केली.
सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास नदीत दोन्ही मुलांचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. अमित राय (वय 18), विशाल दिलेराम (वय 17) आणि निखिल कुमार (वय 18) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहे. नदीकाठच्या सध्या होडीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी पाटस पोलिसचे सहायक पोलिस निरीक्षक संजय नागरगोजे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
What's Your Reaction?