ऐकू येत नसेल तर काय करावे?

ऐकायला कमी येणे, कानातून आवाज येणे, ऐकू कमी आल्याने चार चौघात मिसळायला संकोच वाटणे अशा समस्या दैनंदिन जीवनात अनेकांना भेडसावतात. यातील अनेकजण मनाचा निश्चय करून डॉक्टरांकडून तपासणीही करून घेतात. परंतु कानाच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून न घेतल्याने संबंधितांनी अर्धवट निदानाद्वारे केलेल्या उपचारांचा परिणाम म्हणून समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते. याची परिणीती श्रवण क्षमता कायमची गमावली जाऊ शकते. त्यामुळे कानाची समस्या असेल तर अधिकृत तज्ज्ञांचा सल्ला हाच कर्ण समस्येवरील उपचाराचा 'कानमंत्र' ठरतो.

ऐकू येत नसेल तर काय करावे?

ऐकायला कमी येणे, कानातून आवाज येणे, ऐकू कमी आल्याने चार चौघात मिसळायला संकोच वाटणे अशा समस्या दैनंदिन जीवनात अनेकांना भेडसावतात. यातील अनेकजण मनाचा निश्चय करून डॉक्टरांकडून तपासणीही करून घेतात. परंतु कानाच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून न घेतल्याने संबंधितांनी अर्धवट निदानाद्वारे केलेल्या उपचारांचा परिणाम म्हणून समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते. याची परिणीती श्रवण क्षमता कायमची गमावली जाऊ शकते. त्यामुळे कानाची समस्या असेल तर अधिकृत तज्ज्ञांचा सल्ला हाच कर्ण समस्येवरील उपचाराचा 'कानमंत्र' ठरतो.

एखाद्याला हृदयविकार असेल तर त्या रुग्णाला हृदयरोग तज्ज्ञाकडेच उपचार घ्यावे लागतात. एखादा रुग्ण मेंदूच्या आजाराने त्रासला असेल तर त्याला मेंदूच्या तज्ज्ञाकडे उपचार घेणे आवश्यक ठरते. त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला कानाची काही समस्या असेल तर त्या व्यक्तीने कानाच्या तज्ञाकडे जाणेच फायदेशीर ठरते.

याबाबत छत्रपती संभाजीनगर मधीलअधिकृत पदवीधर श्रवण व वाचा दोष तज्ज्ञ विलास राठोड म्हणतात, वैद्यकीय विज्ञान प्रचंड विकास करत आहे. शरीरातील अनेक अवयव बदलून दुसरा बसवणे, एखादा भाग कापून दुसरा बसविणे अशा अनेक शस्त्रक्रिया होणे हे आता सहजसाध्य झाले आहे. परंतु कान हा एक असा अवयव आहे की तो बदलता येत नाही. कानाचे कामच मुळी संरचनात्मक (Structural) नसून कार्यात्मक (Functionally) आहे. त्यामुळे कानाचे उपचार पदवीधर श्रवण व वाचा दोष तज्ज्ञांकडूनच घेणेच आवश्यक आहे. याउलट कानाच्या उपचारांच्या

बाबतीत घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधित व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त करू शकतो.

माणसाचे अस्तित्वच त्याच्या बोलण्यावर पर्यायाने ऐकण्यावर आहे. समाजात वावरताना आपण चौघात उभे आहोत आणि इतरांचे  बोलणे आपल्याला कमी ऐकू येत आहे किंवा ऐकूच येत नाहीये ही भावनाच व्यक्तीमध्ये न्यूनगंड निर्माण करते. चांगले ऐकू येत असेल तरच व्यक्ती समाजात मिसळतो. अनेकदा जेष्ठ नागरिकांना ऐकू येत नाही. त्यामुळे काहीसे निराश, एकलकोंडे होत असल्याच्या घटना आपण अनेक ठिकाणी पाहतो. त्यांना जर तज्ज्ञांकडून योग्य उपचार आणि चांगले श्रवण यंत्र मिळाले तर त्यांना चांगले ऐकू येऊ लागल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.

कमी ऐकू येणे, ऐकू न येणे अशा समस्या वाढत चालल्या आहेत. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कामगार, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत काम करताना व्यवस्थित ऐकू यावे ही पूर्वअट अथवा संकेत आहे. साहजिकच अशा ठिकाणी काही कानाशी संबंधित समस्या उदभवली तर काहीही करून मला व्यवस्थित ऐकता आले पाहिजे अशी भावना असते. त्यासाठी कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल पण मला ऐकू कमी येण्याच्या/ ऐकू न येण्याच्या समस्येतून सोडवा अशी कळकळीची विनंती संबंधित व्यक्तीकडून केली जाते. केवळ पाण्यासारखा पैसा खर्च करून अल्पकाळासाठी बरे वाटेलही, मात्र दीर्घकाळ चांगले ऐकता येईलच याची खात्री देऊ शकत नाही. परंतु जर त्यांनी अधिकृत तज्ज्ञांकडेच उपचार घेतले तर त्यांना योग्य मार्गदर्शन, उपचार आणि चांगले परिणाम निश्चितपणे मिळू शकतात. संबंधित व्यक्तीचे ऐकू येण्याचे प्रमाण किती आहे,  त्याला कोणत्या प्रकारच्या श्रवण यंत्राची आवश्यकता आहे, आवाजाची वारंवारता किती आहे याची अत्याधुनिक यंत्रांद्वारे अचूक निदान करूनच प्रख्यात अधिकृत ऑडिओलॉजिस्ट विलास राठोड कर्ण दोषाची समस्या असलेल्या व्यक्तीवर योग्य उपचार करतात.

अनधिकृत उपचार करणाऱ्यांवर होऊ शकते कारवाई

सर्व प्रकारच्या श्रवण व वाचा दोषांचे निदान व उपचार करण्याची परवानगी व अधिकार फक्त पदवीधर श्रवण व वाचा दोष तज्ञ (ऑडिओलॉजिस्ट व स्पीच लँग्वेज थेरपिस्ट) यांनाच आहे. (उदा. M.ASLP, B.ASLP, M.Sc.ASLP, B.Sc. ASLP, M.Sc.ASR, B.Sc.ASR, Ph.D. Aud) रिहॅबिलीटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (RCI), भारत सरकार यांच्या RCI ACT १९९२, सेक्शन १३ अन्वये, डिप्लोमा श्रवण व वाचा दोष तज्ज्ञ (D. HLS), कान नाक घसा तज्ज्ञ (E. N. T.), विशेष शिक्षक (D. Ed./B.Ed/M. Ed - H. I), इतर डॉक्टर, इलेक्ट्रॉनिक दुकान चालविणारे, लॉजवर स्वस्तात मशीन विकणारे यांनी, श्रवण दोष असलेल्या व्यक्तींच्या श्रवण तपासण्या स्वतंत्रपणे करणे व त्यांना श्रवण यंत्र पुरविणे हा कायदेशीर गुन्हा आहे. अज्ञानापोटी अशा व्यक्तींकडुन उपचार/ श्रवणयंत्रे घेतल्यामुळे अनेक रुग्णांच्या श्रवण क्षमतेचे, वेळेचे व आर्थिक नुकसान होत आहे. सर्व रुग्णांनी/ नातेवाईकांनी याबाबत जागरूक होणे अत्यंत आवश्यक आहे. यासंदर्भात योग्य चौकशी करून फक्त अधिकृत ऑडिओलॉजिस्ट व स्पीच लँग्वेज थेरपीस्टकडूनच तपासणी व उपचार  तसेच श्रवणयंत्रे घ्यावीत. इथे आवर्जून नमूद करण्यासारखी बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील प्रख्यात श्रवण व वाचा दोष तज्ज्ञ  विलास राठोड  इंडियन स्पीच अँड हिअरिंग असोसिएशनचे (Indian speech and Hearing Association - ISHA) चे सदस्य आहेत.

व्हिआर स्पीच व हिअरिंग क्लिनिकमध्ये आहेत या सुविधा

जन्मजात मूल ते वयोवृद्ध अशा सर्वांच्या सर्व प्रकारच्या वाचा, श्रवण ब चक्कर संबंधित दोषांच्या अचूक निदान व उपचारासाठी अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असे ठिकाण म्हणजे व्हिआर स्पीच व हिअरिंग क्लिनिक. 

१) कोणत्याही व्यक्तीची ऑटोस्कोपद्वारे तपासणी करण्यात येते. यात कानाच्या बाह्य रचनेतील दोष, कानातील मळ, कानाच्या पडद्याची स्थिती, कानात इतर काही असल्यास पाहणी करण्यात येते.

२) लहान मूल, मुख्यतः नवजात मूल यांची तपासणी ओ. ए. ई. यंत्राद्वारे करण्यात येते. यात अंतर्कणाच्या कार्याची माहिती मिळते. श्रवण दोषाबद्दल अंदाज मिळतो.

३) तीन महिन्यांपेक्षा अधिक वयोगटातील मुले आणि प्रतिसाद न देऊ शकणाऱ्या व्यक्ती, कानात पू होणे, मळ साचणे अशा व्यक्तींसाठी येथे बेरा टेस्ट उपलब्ध आहे. श्रवण दोषाचे प्रमाण ,प्रकार, नसांची क्षमता यांची माहिती या चाचण्यांतून मिळते. 

४) तीन वर्षे वयोगटातील मुले तसेच गतिमंदपणा, समजण्याचे दोष, कानात पाणी साचणे, पू होणे, मळ होणे या समस्यांसाठी ऑडीओमीटरच्या ऑडीओमेट्री टेस्ट करण्यात येते. यातून श्रवण दोषांचे प्रमाण व प्रकार यांबाबत माहिती मिळते.

५) सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी इंपेडन्स ऑडिओमीटरच्या साहाय्याने इंपेडन्स ऑडिओमेट्री टेस्ट येथे करण्यात येते. या चाचणीतून मध्य कर्णाच्या स्थितीबद्दल माहिती मिळते. कानातील हवेचा दाब, कानाच्या पडद्यावरील ताण, कानाच्या पडद्यामागे पाणी जमा झाले आहे का ? कानातील हाडांची साखळी तुटलेली किंवा घट्ट झालेली आहे का ? चेहऱ्यावरचा लकवा यांबाबत माहिती मिळते.

पुढील चाचण्या आणि सुविधाही व्हिआर स्पीच व हिअरिंग क्लिनिक येथे उपलब्ध आहेत.

  1. बि. ओ. ए. टेस्ट (B.O.A. Test) : लहान मुलांना आवाज किती प्रमाणात येतो याचे खेळणी व स्क्रीनद्वारे ढोबळ मानाने मूल्यांकन केले जाते.
  2. श्रवण यंत्रे (Hearing Aid) : शास्त्रशुद्ध पद्धतीने बसविण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे.
  3. स्पीच ऑडिओमेट्री टेस्ट (Speech Audiometry Test) : बोली भाषा किती प्रमाणात समजते याचे मूल्यांकन केले जाते.
  4. एडेड ऑडिओमेट्री टेस्ट (Aided Audiometry Test) : श्रवण यंत्राचा किती फायदा होतो याचे मूल्यांकन केले जाते.
  5. टीन्नीटस टेस्ट (Tinnitus Test) : कानातून येणाऱ्या आवाजाचे (कर्ण नादाचे) मूल्यांकन केले जाते.
  6. ईअर मोल्ड (Ear Mould) : कानात श्रवण यंत्र व्यवस्थित बसण्यासाठी.


व्हिआर स्पीच व हिअरिंग क्लिनिकमध्ये कोणी यावे ?

  • ज्यांना ऐकायला कमी येते ?
  • कानातून आवाज येतो ?
  • सध्याच्या श्रवणयंत्राने सर्वत्र स्पष्ट ऐकू येत नाही.
  • श्रवणयंत्र लावून देखील मूल स्पष्ट बोलत नाही.
  •  बोलण्यात आवाजात दोष आहे.
  • मूल उशिरा, अस्पष्ट वा तोतरे बोलत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow