मशीन कधी लावायचे?

मशीन कधी लावायचे?

कानात संसर्ग झाल्याने, पाण्यासदृश पांढरा चिकट द्रव वाहू लागतो, त्यात पू होतो, अनेकदा प्रतिजैविकांच्या मारा केल्याने श्रवणशक्ती कमी होते. ही सगळी लक्षणं हळुहळू दिसू लागतात. त्यांचा थेट परिणाम जाणवत नसल्याने आधीच डॅाक्टरकडे जायला रुग्ण उशीर करतात.

डॅाक्टरांनी कानाला मशीन लावण्याचा सल्ला दिल्यावर तो पाळला जात नाही. मात्र, ही चालढकल केल्यास कायमस्वरुपी बहिरेपणा येऊ शकतो. त्याचा परिणाम संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होतो. हे मशीन मुख्यतः बहिरेपणावर मात करण्यासाठी लावले जाते. कमी ऐकू येण्याचे निदान झाल्यावर तीन महिन्याच्या बाळापासून कुणालाही हे मशीन बसवता येते. मूल मोठे झाले तरी मशीनच्या आतील स्वरयंत्र तसेच राहते. त्याचा मोल्ड केवळ बदलावा लागतो.

यापूर्वी खूप मोठ्या आकाराची श्रवणयंत्रे असत. आता त्यात आमूलाग्र बदल झाला आहे. अत्यंत छोटी, साधी व मोबाईलच्या हेडफोनच्या आकाराची दिसूही न शकणारी यंत्रे आता आहेत. त्यांचा योग्यवेळी वापर केल्यास बहिरेपणावर मात करता येते. बहिरेपणाचे निदान झाल्यानंतर डॅाक्टरांच्य सल्ल्याने मशीन त्वरित लावून घ्यावे.

जर तुम्हालाही ऐकण्याचा त्रास असेल असेल तर आजच अपॉइंटमेंट बुक करा 

9657588677

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow