रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात बिरसा फाइटरचा रास्ता रोको
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: सुशिलकुमार पावरा
शहादा:प्रतिनिधी शहादा-सारंगखेडा,शहादा-शिरपूर शहादा-जयनगर रस्त्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या रास्ता रोको आंदोलनात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,प्रेम भोसले,प्रविण चव्हाण, नीलेश मोते,पवन खर्डे,दिवाण सुळे,किरण ब्राह्मणे, दिपक खर्डे,राहुल रावताळे इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्ते चक्क महामार्गावर बसले व रस्ता जाम केला.१ तासापेक्षा अधिक वेळ महामार्ग रोखून धरला.
शहादा शिरपूर रस्ता दुरूस्त झालाच पाहिजे,शहादा सारंगखेडा रस्ता दुरूस्त झालाच पाहिजे,या प्रशासनाचे करायचे काय? खाली डोके वर पाय,भ्रष्ट अधिकारी मूर्दाबाद, रस्ते प्रशासन मूर्दाबाद, हम सब एक है,लढेंगे जितेंगे,सरकार हमसे डरती है,पुलीस को आगे करती है,विनाश नाही,विकास पाहिजे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.आंदोलनात विविध पक्षाचे ,संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी,मजूर, महिला इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहादा सारंगखेडा,शहादा शिरपूर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असे चित्र दिसत आहे.या रस्त्यावर खड्ड्यामुळे ज्या मुलीला दुर्दैवी मृत्यू झाला तिला भावपूर्ण श्रद्धांजली.मृत्यूला कारणीभूत असणा-या रस्ते अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.जिल्ह्य़ातील खड्डेमय रस्त्याला जेवढे अधिकारी जबाबदार आहेत, तेवढेच जबाबदार येथील पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित,खासदार व आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत.हा रस्ता आश्वासनानंतरही लवकरात लवकर दुरूस्त न झाल्यास बिरसा फायटर्स तर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल. अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली.
What's Your Reaction?