प्रकाश आंबेडकर यांनी गहिनीनाथ गडावर महंतांची घेतली भेट

प्रकाश आंबेडकर यांनी गहिनीनाथ गडावर महंतांची घेतली भेट

(बीड प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडाचे महंत ह भ प विठ्ठल महाराजांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेऊन बंद खोलीत जवळपास चार तास चर्चा केली.

या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून जाणकारांकडून लोकसभा विधानसभेत वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यात परिवर्तनाच्या दिशेने भक्कम पाऊल मानलं जात असून या भेटीने विविध तर्क वितर्क लढवले जात असल्याचे ही ऐकावयास मिळाले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा प्रभारी प्रा.किसन चव्हाण, वंचित बहुजन आघाडी तक्रार निवारण समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. विष्णू जाधव तसेच बीड जिल्ह्याचे अध्यक्ष उद्धवजी खाडे उपस्थित होते.

बीड जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी माहिती दिली की,संत वामन भाऊ यांची पुण्यतिथी दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी च्या भव्य कार्यक्रमास ऍड.श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी हे निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास अगत्याने येणार असल्याचे सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow