श्री गणेश विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
आष्टी (प्रतिनिधी ):आष्टी येथील श्री गणेश विद्यालय आष्टी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृतमोहत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः विद्यार्थीनीनी शिक्षकांच्या मदतीने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी सरदार पटेल, रामानंद तिर्थ, गोविंदभाई श्राॅफ, साहेबराव दादा थोरवे यांच्या प्रतिमा रांगोळीतुन साकारण्यात आल्या.नंतर आष्टी शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पुजन करण्यात आले. त्यानंतर श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री भाउसाहेब कोकणे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी श्रेयश भोगाडे (५वी),प्राजक्ता आजबे (५वी),प्रांजल गिते (६वी),आदित्य बुंदेले (८वी ),यश भोगाडे (९वी), आदित्य वांढरे (९वी),कृष्णा टकले (९वी) यांनी स्वातंत्र्य सेनानी च्या लढ्या विषयी भाषणे केली.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री रमेशसिंहे देसुरकर यांनी केले.सुञसंचालन श्रीमती सुषमा पोकळे यांनी केले तर आभार श्रीमती स्वाती चौधरी यांनी मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री भाउसाहेब कोकणे सर, कोषाध्यक्ष श्री मधुकर वांढरे सर,राजकुमार किसनराव थेटे, महेश शेठ सावंत मुख्याध्यापक रमेशसिंह देसुरकर,पर्यवेक्षक अशोक गाडेकर कुंडलिक सारूक ,नवनाथ दातार स्वाती चौधरी, मोहन ठोंबरे, नवनाथ मोरे,दत्तात्रय करडकर ,सतिश वराट, सुरेखा हजारे, सुषमा पोकळे, रविकांत तरटे, अनिता वाघमारे. भैरवनाथ केरूळकर, भाऊसाहेब थेटे, संजयकुमार थेटे, बाळासाहेब खंदारे, पोपट घुले व सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .तसेच संस्थेचे माजी.सचिव व मुख्याध्यापक कै.ञिंबकराव रामभाऊ सावंत सर यांच्या जयंतीनिमित्त महेश शेठ सावंत यांनी विद्यार्थ्यांना खायचे वाटप केले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री भाउसाहेब कोकणे सर यांच्या अमृतमोहत्सव साजरा करण्यात आला त्यानिमीत्ताने सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.
What's Your Reaction?