बीड लोकसभा निवडणुकीसाठी आजपर्यंत दहा अर्ज दाखल

बीड लोकसभा निवडणुकीसाठी आजपर्यंत दहा अर्ज दाखल

बीड(प्रतिनिधी) 39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज चौथ्या दिवशी सहा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले असून आत्तापर्यंत 10 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती बीड जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

 39 बीड लोकसभा मतदारसंघातून आज 3 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये शेख एजाज शेख उमर, भास्कर किसन शिंदे , तुकाराम विठोबा उगले तर तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून तीन अर्ज सादर करण्यात आले. दोन अर्ज बजरंग मनोहर सोनवणे यांचे आहेत तर एक सारिका बजरंग सोनवणे यांचा अर्ज आहे. या सर्व उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समक्ष अर्ज सादर सादर केला.  

सोमवारी 14 इच्छुक उमेदवारांना 26 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले. आजपर्यंत एकूण 94 इच्छुक उमेदवारांना 211 नामनिर्देशन पत्राचे वाटप झाले. 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत राहील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow