ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावा!

ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावा!

बीड प्रतिनिधी : जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. ऊसतोड कामगारांसाठी शासनाने लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन केले आहे परंतू त्याची प्रभावी अंमलबजावणी होतांना आढळून येत नाही यासाठी वेळोवेळी ऊसतोड कामगार कृती समितीने शासन दरबारी मागण्या केलेल्या आहेत परंतू पोकळ आश्वासनाशिवाय वाटयाला काही आलेले नाही त्यामुळे मंत्री महोदय आजच्या बीडमधील सभेमध्ये ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार आहेत का? असा सवाल महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार कृती समितीने पत्रकाआधारे विचारला आहे.

महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर काम करणार्‍या संस्थाच्या मागण्या आहेत की, 1. स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ अंतर्गत असणार्‍या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी., 2.शासन निर्णयानुसार सहकारी व खाजगी कारखाने यांनी ऊसतोड कामगार महामंडळाला प्रति टन 10/-रुपये प्रमाणे रक्कम अदा करावी आजपर्यंत फक्त प्रति टन 03/- रुपये नुसार कारखान्याने महामंडळाला रक्कम अदा केलेली आहे व व तसेच अनेक कारखाने यांनी महामंडळाला निधी वर्ग केला नाही त्यांना त्याची शासनाने सक्ती करावी., 3.सर्व ऊसतोड कामगार हे कारखानाचे कामगार म्हणून नोंदित झाले पाहिजेत., 4.सर्व कामगारांना स्थलांतरापुर्वी आरोग्य तपासणी व मेडिकल किटचे वाटप जन आरोग्य योजनेतून स्थलांतरापूर्वी देण्यात यावे., 5.सर्व ऊसतोड कामगारांना कारखाना स्थलांतरापूर्वी सहा महिन्याचे आगाऊ रेशन वाटप करण्यात यावे., 6.जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ऊसतोड कामगारांच्या मुलांना स्थलांतरित होण्यापूर्वी शिक्षण हमी कार्ड वाटप करावे., 7. एच.आय.व्ही. व दुर्धर आजाराने ग्रस्त ऊसतोड कामगारांना 6 महिन्याचे औषध मिळाले पाहिजे., 8. कामगारांना 8 तासाचे काम असावे, त्यापेक्षा जास्त तास काम केले तर जास्त रोजगार द्यावा., 9.गाव पातळीवर ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वस्तीगृह योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति विद्यार्थी रुपये 100/- अनुदान अदा करण्यात यावे आजमित्तीला फक्त 33/- रुपये प्रति विद्यार्थी अनुदान मिळत आहे त्यामध्ये एक वेळचा नाश्ता करणे सुद्धा शक्य नसल्याने हे अनुदान वाढवावे. 10.महिलांची उचल महिलांना व पुरुषाची उचल पुरुषांना त्यांच्या बँक खात्यावर देण्याची सक्ती करावी., 11.जिल्हास्तरावर ऊसतोड कामगारांसाठी शासनाच्या वतीने टास्क फोर्सची स्थापना करण्यात यावी व त्यामध्ये शासकीय यंत्रणेतील अधिकारी कारखाना मालक कारखान्याचे अधिकारी मुकादम ऊसतोड कामगार स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी महिला प्रतिनिधी यांची नियुक्ती करावी.

12. ऊसतोड कामगारांना येणार्‍या अडचणी नोंद करण्यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय विमा संरक्षण व मदत करण्यासाठी एक स्वतंत्र टोल-फ्री हेल्पलाईन असावी., 13. कारखाना स्तरावर प्रत्येक 15 दिवसाला आरोग्य तपासणी केली जावी व कारखाना स्तरावर सहा महिन्यासाठी आरोग्य केंद्राची स्थापना करावी म्बुलन्स ची सुविधा कारखाना स्तरावर उपलब्ध असावी. तसेच 06 वर्षाच्या आतील बालकांना पोषण आहार व फिरत्या पाळणा घराची सुविधा उपलब्ध व्हावी., 14. ऊसतोड कामगार कारखाना परिसरात असताना आठवड्याला पोलीस पेट्रोलिंग व्हावी., 15.जनावरांसाठी कारखान्यावर पशु वैद्यकिय दवाखाना चालू असावा., 16. ऊसतोडकामगार कारखान्यावर स्थलांतरित झाल्यावर गावात राहणार्‍या त्यांच्या वयोवृद्ध (आई-वडील) यांच्यासाठी ’अन्न’ मिळाले पाहिजे. त्यासाठी ओल्ड एज किचन ची व्यवस्था करावी.

17. विमा संरक्षण व आरोग्य कार्ड महामंडळानी दयावे., 18. कोरोना काळात शासनाने तयार केलेल्या आरोग्य सेतू प प्रमाणे उसतोड कामगारांसाठी मदत करणारे अ‍ॅप तयार करावे., 19.जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी बाल रुग्णालय व प्रसुती रुग्णालय यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना ऊसतोड कामगारांना उपलब्ध करुन द्याव्यात व दवाखान्यांना तशी सक्ती करावी. 20. कारखाना पातळीवर जिल्ह्यातील सर्व कारखाना परिसरात ऊसतोड कामगार जिथे राहतात तिथे त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज व शौचालयाची सुविधा करणे बंधनकारक करावे.

21.01 व्यक्ती 01 कोयता असा कामगारांना दर्जा मिळावा अशा विविध मागण्या निवेदना आधारे ऊसतोड कामगार कृती समिती महाराष्ट्र राज्यचे चारु चौधरी, ओमप्रकाश गिरी, बाजीराव गिरी, बाजीराव ढाकणे,डॉ.संजय तांदळे, बाबासाहेब कोकाटे,जीवन राठोड, अशोक फरताडे, ज्ञानेश्वर जोगदंड, ज्ञानेश्वर जाधव, श्री.मळेकर मामा, नितीन शिंदे, सय्यद नय्युम आदींनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow