भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होणार, आयटी क्षेत्राला मिळणार चालना

Web 3 Internet: नव्या पिढीसाठी इंटरनेट (Internet) हे चमत्कारापेक्षा कमी नाही. त्यामुळं लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आले आहेत. काही मिनिटांचे काम आता सेकंदात होत आहेत. तसेच इंटरनेटच्या मदतीनं लाखो तरुण चांगले रोजगार मिळवून प्रगती करत आहेत. आता इंटरनेटचा पुढचा टप्पा वेब-3 (Web 3) येत आहे. यामुळं केवळ तंत्रज्ञानाचे जगच बदलणार नाही तर भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होतील. यामुळं आयटी क्षेत्राला यातून मोठी चालना मिळणार आहे.  10 वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जातील नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात, वेब-3 (Web 3 Internet) च्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि Metaverse च्या मदतीने भारतात 200 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. अहवालानुसार, इंटरनेट वेब-3 ची नवीन आवृत्ती विकेंद्रित ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित असेल. या नवीन इंटरनेटमध्ये पुढील 10 वर्षांत देशात सुमारे 20 लाख उच्च पगाराच्या नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे. एका अंदाजानुसार, भारतात वेब-3 क्षेत्रात जवळपास 900 लहान-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. 2022 मध्ये जागतिक वेब-3 विकासामध्ये त्यांचा वाटा सुमारे 11 टक्के होता. यामुळे जगात वेब-3 डेव्हलपर्सचा तिसरा सर्वात मोठा पूल देशात तयार झाला आहे. याशिवाय नवीन लोकांनाही या क्षेत्रात कनिष्ठ स्तरावर सहज नोकऱ्या मिळतील. वेब-3 'या' क्षेत्रांवर परिणाम करणार इंटरनेटच्या वेब-3 आवृत्तीचा पुरवठा साखळी व्यवस्थापन, आरोग्यसेवा, आयटी, शिक्षण आणि ओळखपत्र क्षेत्रांवर थेट परिणाम होईल. या क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदल होतील आणि त्यांचा चेहरामोहरा बदलेल. त्याच्या प्रसारासाठी योग्य संधी भारतात आधीच उपलब्ध आहेत. त्यामुळं झपाट्यानं वाढणाऱ्या आयटी आणि सेवा क्षेत्रावर त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येईल. ते तयार करण्यासाठी आधीपासूनच विद्यमान इंटरनेट पायाभूत सुविधा वापरल्या जात आहेत. त्यामुळं वेब-3 सहज ओळखता येईल. तसेच, यामुळं वेब-2 साठी स्पर्धा निर्माण होणार नाही. वेब-3 इंटरनेट म्हणजे काय? वेब-3 ला वेब 3.0 असेही म्हणतात. इंटरनेट जगताचा हा पुढचा टप्पा आहे. यामध्ये विकेंद्रित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. क्रिप्टोकरन्सी, NFT आणि Metaverse ही त्याची उदाहरणे आहेत. इंटरनेट वेब-3 चा वापर मशीन लर्निंग आणि एआयमध्येही केला जात आहे. महत्त्वाच्या बातम्या: How To Boost Internet Speed : इंटरनेट स्लो झाल्यानं चिडचिड होतेय? वैतागू नका, 'या' टीप्स फॉलो करा अन् हाय स्पीडवर इंटरनेट मिळवा!

भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होणार, आयटी क्षेत्राला मिळणार चालना

Web 3 Internet: नव्या पिढीसाठी इंटरनेट (Internet) हे चमत्कारापेक्षा कमी नाही. त्यामुळं लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आले आहेत. काही मिनिटांचे काम आता सेकंदात होत आहेत. तसेच इंटरनेटच्या मदतीनं लाखो तरुण चांगले रोजगार मिळवून प्रगती करत आहेत. आता इंटरनेटचा पुढचा टप्पा वेब-3 (Web 3) येत आहे. यामुळं केवळ तंत्रज्ञानाचे जगच बदलणार नाही तर भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होतील. यामुळं आयटी क्षेत्राला यातून मोठी चालना मिळणार आहे. 

10 वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जातील

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात, वेब-3 (Web 3 Internet) च्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि Metaverse च्या मदतीने भारतात 200 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. अहवालानुसार, इंटरनेट वेब-3 ची नवीन आवृत्ती विकेंद्रित ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित असेल. या नवीन इंटरनेटमध्ये पुढील 10 वर्षांत देशात सुमारे 20 लाख उच्च पगाराच्या नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे. एका अंदाजानुसार, भारतात वेब-3 क्षेत्रात जवळपास 900 लहान-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. 2022 मध्ये जागतिक वेब-3 विकासामध्ये त्यांचा वाटा सुमारे 11 टक्के होता. यामुळे जगात वेब-3 डेव्हलपर्सचा तिसरा सर्वात मोठा पूल देशात तयार झाला आहे. याशिवाय नवीन लोकांनाही या क्षेत्रात कनिष्ठ स्तरावर सहज नोकऱ्या मिळतील.

वेब-3 'या' क्षेत्रांवर परिणाम करणार

इंटरनेटच्या वेब-3 आवृत्तीचा पुरवठा साखळी व्यवस्थापन, आरोग्यसेवा, आयटी, शिक्षण आणि ओळखपत्र क्षेत्रांवर थेट परिणाम होईल. या क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदल होतील आणि त्यांचा चेहरामोहरा बदलेल. त्याच्या प्रसारासाठी योग्य संधी भारतात आधीच उपलब्ध आहेत. त्यामुळं झपाट्यानं वाढणाऱ्या आयटी आणि सेवा क्षेत्रावर त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येईल. ते तयार करण्यासाठी आधीपासूनच विद्यमान इंटरनेट पायाभूत सुविधा वापरल्या जात आहेत. त्यामुळं वेब-3 सहज ओळखता येईल. तसेच, यामुळं वेब-2 साठी स्पर्धा निर्माण होणार नाही.

वेब-3 इंटरनेट म्हणजे काय?

वेब-3 ला वेब 3.0 असेही म्हणतात. इंटरनेट जगताचा हा पुढचा टप्पा आहे. यामध्ये विकेंद्रित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. क्रिप्टोकरन्सी, NFT आणि Metaverse ही त्याची उदाहरणे आहेत. इंटरनेट वेब-3 चा वापर मशीन लर्निंग आणि एआयमध्येही केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

How To Boost Internet Speed : इंटरनेट स्लो झाल्यानं चिडचिड होतेय? वैतागू नका, 'या' टीप्स फॉलो करा अन् हाय स्पीडवर इंटरनेट मिळवा!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow