करचुंडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

करचुंडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

बीड (प्रतिनिधी)- मौजे करचुंडी ता.जि. बीड येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्री क्षेत्र नारायण गडाचे चौथे वारस ह.भ.प. गोविंद बाबा यांच्या १५६ व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे होणार आहेत- सप्ताहास दि. ४ जानेवारी, २०२४ गुरुवार रोजी पासून प्रारंभ होत आहे व दि. ११ जानेवारी, २०२४ गुरुवार रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे. दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ जगद्गुरु तुकाराम गाथा भजन, दुपारी २ ते ५ या वेळेत भावार्थ रामायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८.३० ते १०.३० हरी किर्तन व नंतर हरी जागर होईल. दि.४ जानेवारी रोजी ह.भ.प. भागवत महाराज गंगाधर (मालेगाव) यांचे कीर्तन होईल. दि.५ रोजी ह.भ.प. अक्षय महाराज पिंगळे (काटवटवाडी), ६ रोजी भागवताचार्य ह.भ.प. सिद्धेश्वर महाराज बागलाने (काकडहिरा), ७ रोजी ह.भ.प. भानुदास महाराज शास्त्री, श्रीराम संस्थान, गोमळवाडा, दि.८ रोजी ह भ प सत्यवान महाराज लाटे, (तपोभूमी, इमामपूर) व दि.९ रोजी श्री बंकटस्वामी संस्थान, निनगुरचे मठाधिपती ह.भ.प. परम पूज्य गुरुवर्य महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, दि.१० जानेवारी रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माऊली मंझरीकर, तसेच गुरुवार दि. ११ जानेवारी रोजी ह.भ.प. परमपूज्य गुरुवर्य महंत प्रेम मूर्ती शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र मठाधिपती, श्रीक्षेत्र संस्थान, नारायणगड यांच्या काल्याच्या कीर्तनाने सकाळी ११ ते १ या वेळेत सप्ताहाची सांगता होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे करचुंडी येथील गावकऱ्यांच्या वतीने कळविण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow