धनगर आरक्षणावर तोडगा निघणार ?

धनगर आरक्षणावर तोडगा निघणार ?

अहमदनगर प्रतिनिधी :- चौंडी येथे गेल्या 16 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी बुधवारपासून पाणी प्राशन करणं बंद केलं. मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र दोन दिवस उलटून गेले तरीही बैठक झाली नाही. याच्या निषेधार्थ आंदोलकांनी पाणी देखील सोडलंय. धनगर समाजाच्या आरक्षणप्रकरणी आज धनगर नेत्यांसोबत सरकार बैठक घेणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. आज  सह्याद्री अतिथिगृहात ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत आरक्षणाचा तिढा सुटणार की आणखी तीव्र होणार हे पहाणं महत्वाचं असणार आहे,

अहमदनगरच्या चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे.धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.या आंदोलनाची वाढती आक्रमकता लक्षात घेऊन सरकारने आज मुंबईत बैठक बोलावली आहे.या बैठकीसाठी यशवंत सेनेचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले आहे. तसंच आता या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडकडूनही पाठिंबा देण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow